‘शेर की दहाड सबसे अलग है!’ सक्षणा सलगर यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून मेळावे घेतले जात आहेत. शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सह अजित पवार यांच्या गटावर जोरदार निशाना साधला.
मुंबई : अजित पवार यांनी बंडकोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते आणि आमदार हे अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. तर आता शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून मेळावे घेतले जात आहेत. शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू आहे. यावेळी सक्षणा सलगर यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सह अजित पवार यांच्या गटावर जोरदार निशाना साधला. तसेच त्यांनी, 2024 ला एक सुनामी येईल त्याच नाव शरद पवार असे म्हटलं आहे. तर चांदा ते बांदा पर्यंतचा सामान्य कार्यकर्ता हा शरद पवार यांच्या सोबत आहे. तर जसे शिवरायांसोबत विचारांचे मावळे होते. तसेत तुमच्या मागे ही हिरकण्या हे मावळे आणि तुमची ताकद बनून असतील असा विश्वास दाखवताना, अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गद्दारांना 2024 ला नाठा बैलांना बाजार दाखवणारच असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय.