अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमान खानवर कारवाई करण्याची मागणी
अनुज थापनच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी उच्च न्यायालया धाव घेतली आहे. अनुजची आत्महत्या नसून त्याच्या मृत्यूमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप थापनचे कुटुंबीय आणि वकिलांनी केला आहे.
बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाशी संबंधित आरोपी अनुज थापन याने तुरुंगात आत्महत्या केल्याचा माहिती समोर आली होती. उपचारादरम्यान अनुज थापनचा मृत्यू झाला. त्यानंतर आता अनुजच्या कुटुंबीयांनी थेट उच्च न्यायालयाकडे धाव घेतली असून अभिनेता सलमान खानवर कारवाईची मागणी केली आहे.
कुटुंबीयांची नेमकी मागणी काय?
अनुज थापनच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाकडे सलमान खानवर कारवाईची मागणी केली आहे. त्याच बरोबर या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अनुजची आत्महत्या नसून त्याच्या मृत्यूमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप थापनचे कुटुंबीय आणि वकिलांनी केला आहे.
Published on: May 04, 2024 05:20 PM