सपाचे नेते अबू आझमी यांच्या अडचणीत वाढ; 20 एप्रिलला हजर राहण्याचे कोणाचे आदेश?

| Updated on: Apr 10, 2023 | 4:18 PM

आयकर विभागाच्या वाराणसी शाखेने अबू आझमी यांना 160 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी समन्स पाठवला आहे. एवढेच नाही तर आझमी यांनी गेल्या काही वर्षांत वाराणसीपासून मुंबईपर्यंत हवालाद्वारे 40 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे

मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. आयकर विभागाच्या वाराणसी शाखेने अबू आझमी यांना 160 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी समन्स पाठवला आहे. एवढेच नाही तर आझमी यांनी गेल्या काही वर्षांत वाराणसीपासून मुंबईपर्यंत हवालाद्वारे 40 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. आझमी यांना 20 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभाग वाराणसीतील विनायक ग्रुपची चौकशी करत असताना आझमी यांचे नाव समोर आले आहे.

Published on: Apr 10, 2023 04:18 PM