कागलचं राजकारण पेटलं; हसन मुश्रीफ भाजपसोबत आल्याने समरजीत घाटगे नाराज, पुढे काय घडणार?
रविवारी राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील शपथ घेतल्याने भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे नाराज असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर: रविवारी राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील शपथ घेतल्याने भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे नाराज असल्याची चर्चा आहे. समरजीत घाटगे हे आज कोल्हापुरातील कागल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत. समरजित घाटगे हे आज कागलमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय.
Published on: Jul 06, 2023 10:56 AM