मुश्रीफ यांना मंत्रिपद नाराज समरजित घाटगे थेट फडणवीस यांच्या भेटीला, पडद्यामागे काय हालचाली?
यावेळी अजित पवार यांच्यासह त्यांच्या ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटासह भाजप नेत्यांच्यामध्ये कमालिची नाराजी समोर येत आहे. तर शिंदे-फडणवीस-पवार सरकारची सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून तारेवरून कसरत सुरू आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारण सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता प्रवेशामुळे ढवळून निघालं आहे. त्याचबरोबर इतर कारणांमुळे देखील राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासह त्यांच्या ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटासह भाजप नेत्यांच्यामध्ये कमालिची नाराजी समोर येत आहे. तर शिंदे-फडणवीस-पवार सरकारची सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून तारेवरून कसरत सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठकांचं सत्र सुरुच आहे. एकीकडे सत्तेत येत अजित पवार गट खूश असल्याचे दिसत असताच मात्र आता भाजपमध्येच मोठी नाराजी समोर येत आहे. अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूरमध्ये पहिली नाराजी समोर आली. कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक तर कागल विधानसभेसाठी इच्छुक आहेत. याचदरम्यान मुश्रीफ यांना मंत्रीपद दिल्याने ते नाराज आहेत. तर काल त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांची नाराजी आता स्पष्ट होत आहे. तर ते मोठा निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.