समरजीत घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार ? सोशल मिडियातून कमळ चिन्ह हटवलं
एकीकडे विधानसभा निवडणूकात भाजप सर्वाधिक जागा लढविणार असल्याने महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाला किती जागा मिळणार यावरुन धुसफूस सुरु झालेली आहे.दुसरीकडे मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेचे श्रेय घेण्यावरुन हमरी तुमरी सुरु आहे.त्यातच भाजपाला कोल्हापूरमध्ये मोठा झटका बसला आहे.
राज्यात राजकीय विश्वात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठी उलथापालथ होणार आहे. भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. समरजीत घाटगे 3 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा भाजपला कोल्हापूरात मोठा झटका मानला जात आहे.आता कोल्हापूरातील महत्वाच्या असलेल्या कागलमध्ये समरजीत घाटगे विरोधात हसन मुश्रीम यांच्यात लढत होणे आता निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असल्याने मोठी राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येतील तसतसे नाराज नेते पक्ष बदतील असे म्हटले जात आहे.बदललेल्या परिस्थितीमुळे काही नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेते पक्षांतर करतील, असे दावे केले जात आहेत. दरम्यान, मतदारसंघातील बदलेल्या परिस्थितीमुळे भाजपानेते समरजित सिंह घाटगे पक्षांतर करून शरद पवार गटात प्रवेश करतील असे म्हटले जात आहे.त्यांनी आपल्या सोशलमिडिया अकाऊंटवरुन कमळ चिन्ह देखली हटविले आहे.