संभाजी भिडे गुरूजी यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली; आता नेहरू यांना केलं टार्गेट, म्हणाले, ‘कोणतंही कर्तृत्व…’
अमरावतीत त्यांनी दोनच दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभर त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर काल त्यांचा यवतमाळ येथील स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात व्याख्यान झाले. या व्याख्यानात देखील भिडे यांनी थेट अखंड भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर गरळ ओकली.
यवतमाळ, 30 जुलै 2023 | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी आता आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच्याआधी अमरावतीत त्यांनी दोनच दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभर त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर काल त्यांचा यवतमाळ येथील स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात व्याख्यान झाले. या व्याख्यानात देखील भिडे यांनी थेट अखंड भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर गरळ ओकली. यावेळी, अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही अशी टीका भिडे यांनी केली. तर कोणतंही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले. तर नेहरूंनी केलेल्या ‘पंचशील’ करारामुळे चीनकडून भारताचा पराभव झाला, तर इशान्येकडील भूभाग हा चीनने घेतला. जो आजपर्यंत परत घेता आलेला नाही. तर कोणत्याच पक्षाने तसा प्रयत्न केला नाही. आजही यावर कोणताच लोकप्रतिनिधी बोलत नाही अशी खंत व्यक्त केली. महात्मा गांधी पाठोपाठ आता भिडे यांनी नेहरू यांच्यावर टीका केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.