संभाजी भिडे गुरुजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, काय अजेंडा?
राज्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत असतात. ते मूळचे सांगलीतील रहिवासी आहेत.
मुंबईः वेगवेगळी वक्तव्य आणि भूमिकांवरून नेहमीच वादात राहणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) ऊर्फ भिडे गुरुजी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीला पोहोचले. मंत्रालयात संभाजी भिडे शिंदे यांच्या भेटीला गेले. मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांना दिली. संभाजी भिडे मंत्रालयात आले त्यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) हेदेखील उपस्थित होते. संभाजी भिडे हे एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत. राज्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत असतात. ते मूळचे सांगलीतील रहिवासी आहेत. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या भिडे गुरुजींनी काही काळानंतर कट्टर हिंदुत्वावर आधारीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटना स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या तत्त्वांनुसार या संघटनेचं काम चालतं.