‘संभाजी भिडे व्हॉट्सचे बळी ठरले, त्यांनी पुन्हा विचार करावा’; दवे यांचं भिडे यांना आवाहन
यवतमाळ येथील व्याख्यानात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल बोलताना, नेहरु यांचं अखंड हिंदुस्थानसाठी नखाएवढंही योगदान नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे. यावरून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील भिडे यांच्यावर निशाना साधला आहे.
पुणे, 30 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांनी महात्मा गांधी यांचे वडिल हे एक मुस्लिम होते असे वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभप आंदोलन झाले होते. तर त्यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एक वादग्रस्त विधान केलंय. यवतमाळ येथील व्याख्यानात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल बोलताना, नेहरु यांचं अखंड हिंदुस्थानसाठी नखाएवढंही योगदान नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे. यावरून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील भिडे यांच्यावर निशाना साधला आहे. दवे यांनी, महात्मा गांधी यांच्यावर केलेली टीका ही कोणत्याही सुज्ञ मानसाला किंवा हिंदूत्वावर प्रेम करणाऱ्या माणसाला पटणारी नाहीत. तर भिडे हे व्हॉट्स अॅपचे बळी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विधांनांचा पुन्हा एकदा विचार करावा असे म्हटलं आहे. याबरोबर आनंद दवे यांनी आणखीन काय म्हटलं आहे, पाहा हा व्हिडिओ…