संभाजी भिडे यांनी एकीकडे नोटीस तर दुसरीकडे चिपळूणमध्ये मोठा धक्का, काय झालं पाहा….
गेल्या आठवड्यापासून राज्यात यावरून आंदोलने केली जात आहेत. तर याचमुद्द्यावरून अधिवेशन देखील गाजत आहे. याचदरम्यान आता भिडे यांच्या अडचणी वाढल्याचे तर दुसरीकडे त्यांचे व्याख्यानाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे.
रत्नागिरी, 03 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून तिव्र पडसाद आता उमटत आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यात यावरून आंदोलने केली जात आहेत. तर याचमुद्द्यावरून अधिवेशन देखील गाजत आहे. याचदरम्यान आता भिडे यांच्या अडचणी वाढल्याचे तर दुसरीकडे त्यांचे व्याख्यानाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अमरावतीत गुन्हा दाखल झाला असून आता त्यांना 8 दिवसात अमरावती पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तशी नोटीस भिडे व आयोजकांना जारी करण्यात आली आहे. याचदरम्यान आता भिडे यांच्या चिपळून येथील कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. याच्याआधी त्यांच्या कार्यक्रमाला औरंगाबाद येथे देखील परवानगी नाकारण्यात आली होती.