Manoj Akhare : छत्रपती संभाजी महाराजांवरील अजित पवार यांच्या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडचे समर्थन
छत्रपती शिवाजी राज्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणं काही वावगं नाही.
छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणावे किंवा नाही, यावरून सध्या राजकारण गरम होत आहे. कारण आहे विरोधी पक्ष नेते अजित पवार. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते,’ असे वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय पक्षांसह संघटनांनी निषेध केला. मात्र छत्रपती संभाजी महाराजांवरील अजित पवार यांच्या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडचे समर्थन दिलं आहे.
संभाजी ब्रिगेडचे समर्थन देताना मनोष आक्रे यांनी, संभाजीराजे यांनी विरमरणाने भारतीय संस्कृतीचं रक्षण केलं. तर छत्रपती शिवाजी राज्यांनी स्वराज्य स्थापन करत त्यावेळी स्वातंत्र लढाच उभारला. तो काही धार्मिक लढा नव्हता. त्याच स्वराज्यासाठी संभाजीराजांनी लढा दिल्याचे आक्रे म्हणाले.
तर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य जपलं म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणं काही वावगं नसल्याचे आक्रे म्हणाले. त्यांचा धर्मच स्वराज्य रक्षण हाच होता.