संभाजी छत्रपती शरद पवारांची भेट घेणार, भेटीचे नेमके कारण काय ?
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण रंगलं आहे. विरोधक तसेच सत्ताधारी एकमेकांवर आरोप करताना दिसतायत. खासदार संभाजी छत्रपती हे सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते ठिकठिकाणी आपली भूमिका मांडताना दिसतायत. याच पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती हे उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. उद्या (गुरुवारी) सकाळी साडे नऊ […]
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण रंगलं आहे. विरोधक तसेच सत्ताधारी एकमेकांवर आरोप करताना दिसतायत. खासदार संभाजी छत्रपती हे सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते ठिकठिकाणी आपली भूमिका मांडताना दिसतायत. याच पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती हे उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. उद्या (गुरुवारी) सकाळी साडे नऊ वाजता ही भेट होणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.