“छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे सुराज्य केलं, तसं 2 टक्के जरी काम करता आलं तरी माझं भाग्य”

| Updated on: Mar 22, 2023 | 3:32 PM

"छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे सुराज्य केलं, तसं 2 टक्के जरी काम करता आलं तरी माझं भाग्य असेल", असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी गडकिल्ल्यांविषयीही महत्वाचं वक्तव्य केलं आहे. पाहा...

कोल्हापूर : “छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे सुराज्य केलं, तसं 2 टक्के जरी काम करता आलं तरी माझं भाग्य असेल”, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. “स्वराज्य हे सुराज्य व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे सुराज्य केलं तसं दोन टक्के जरी काम करता आलं तर ते भाग्य आहे. नवी मुंबईत खूप मोठ्या जोरात सभा होणार आहे. नाशिक, संभाजीनगर, आणि आता कोल्हापुरातून देखील लढण्यासाठी कार्यकर्त्यांची इच्छा होत असेल तर चांगली गोष्ट आहे. आता ‘स्वराज्य’ ला संपूर्ण राज्यात न्यायचं आहे,असं संभाजीराजे म्हणाले आहेत. यंदाचा 6 जून हा 350 वा राज्यभिषेक सोहळा आहे. सरकारनं गडकोट किल्ल्यांसाठी जाहीर केलेला निधी योग्य ठिकाणी खर्च व्हावा, अशी इच्छाही संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

Published on: Mar 22, 2023 03:32 PM
बुलढाण्यावरून रविकांत तुपकरांचा राजू शेट्टींना इशारा; म्हणाले, आम्ही तयार आहोत
लोकसभा निवडणुकीत युतीची साथ की महाविकास आघाडीच्या हातात हात? स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय?