Sambhaji Raje | ‘घराण्यात फूट पाडण्याचा इतिहास जुना’ संभाजीराजेंच वक्तव्य

| Updated on: Jun 06, 2022 | 7:43 PM

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर आज संभाजीराजे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आले होते. त्यानंतर ते राज्यसभा निवडणुवरून काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज संभाजीराजे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला.

रायगड : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागेवरून जारदार राजकारण सुरू आहे. येथे भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभे राहीले आहेत. तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांना शिवसेनेनच्या अटीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर राज्यात अनेक तर्क वितर्क लावले जात होते. तर माजी खासदार संभाजीराजे शिवसेनेवर (Shivsena) काय बोलणार याकडे लक्ष लागून राहीले होते. आज रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने मोठ्या संख्येनं शिवप्रेमी रायगडावर (Raigad)जमा झाले होते. यावेळी राज्यसभा निवडणुकीतील माघारीवर बोलताना संभाजीराजे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधताना, घराण्यात फूट पाडण्याचा इतिहास जुना असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी शहाजी राजे यांचेही उदाहरण दिले.

 

 

Published on: Jun 06, 2022 07:42 PM
“आपण आपल्या पिलावळांना समजून सांगितलं पाहिजे…”- आमदार सुनील शेळके
Maulana Mufti Mohammed Ismail | दादा भूसें, मौलाना मुफ्ती मोहम्मद यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?