Sambhaji Raje Meet Jalna protestors | संभाजीराजे जखमी आंदोलकांच्या भेटीसाठी, आंदोलकांनी सांगितला तो प्रसंग
जखमींच्या तब्यतीबद्दल संभाजीराजे यांनी जाणून घेतलं. अंबड उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी संभाजीराजे यांनी गावात जाऊन जखमींची विचारपूस केली. डॉक्टरांशीही संभाजीराजे यांनी संवाद साधला. शिवरायांच्या वारसाने विचारपूस केल्याने आंदोलकांच्या डोळ्यात अश्रृ आले होते. आंदोलकांचे डोळे पानावले होते.
जालना, २ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या आंदोलनात अनेक जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यात उमटत आहेत. विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. आमदार रोहित पवार यांनी पहाटे जालन्यात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे संभाजीराजे जखमी आंदोलकांच्या भेटीसाठी पोहचले. त्यानंतर त्यांनी जखमी आंदोलकांची विचारपूस केली. जखमींच्या तब्यतीबद्दल संभाजीराजे यांनी जाणून घेतलं. अंबड उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी संभाजीराजे यांनी गावात जाऊन जखमींची विचारपूस केली. डॉक्टरांशीही संभाजीराजे यांनी संवाद साधला. शिवरायांच्या वारसाने विचारपूस केल्याने आंदोलकांच्या डोळ्यात अश्रृ आले होते. आंदोलकांचे डोळे पानावले होते. आंदोलन व्यवस्थित सुरू होतं. शेवटच्या पाच मिनिटांत काय झालं काही कळलं नाही. कुणाचातरी फोन आला. त्यानंतर लाठीचार्ज सुरू झाला, असं आंदोलनांची संभाजीराजे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी ते सांगत होते.