VIDEO | जळगावात तणावपूर्ण शांतता, पोलीसांची धावाधाव; काय आहे नेमकं कारण?

| Updated on: May 20, 2023 | 10:36 AM

संभाजीनगर, मुंबईतील मालवणी, नंदूरबार, नगर आणि अकोल्यात रात्रीच्यावेळी दोन गटात तुफान राडा झाल्याच्या घटना घटल्या आहेत. येथील वातावरण सध्या शांत असून शेगावमधील बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. तर अकोल्यातील दंगलग्रस्त भाग वगळून इतर ठिकाणी लागू केलेला जमावबंदी आदेश मागे घेण्यात आला आहे.

जळगाव : राज्यात अनेक शहरांमध्ये दोन गटांमध्ये राडे होताना दिसत आहेत. संभाजीनगर, मुंबईतील मालवणी, नंदूरबार, नगर आणि अकोल्यात रात्रीच्यावेळी दोन गटात तुफान राडा झाल्याच्या घटना घटल्या आहेत. येथील वातावरण सध्या शांत असून शेगावमधील बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. तर अकोल्यातील दंगलग्रस्त भाग वगळून इतर ठिकाणी लागू केलेला जमावबंदी आदेश मागे घेण्यात आला आहे. एकिकडे परिस्थिती सामान्य होत असतानाच जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात आज धार्मिक स्थळावर दगडफेक केल्याच्या कारणावरून काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी घटनांसाठी दाखल होऊन तणाव नियंत्रणात आणले दरम्यान रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. काही दिवसांपुर्वीच सम्राट कॉलनी परिसरात वाढदिवसाच्या केक कापण्यावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. त्यानंतर दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच महामार्गाजवळील सम्राट कॉलनी परिसरातील एका धार्मिक स्थळावर आज काही तरुणांकडून दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेमुळे जळगाव शहर शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या संदर्भात अद्यापपर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर जमावाला पांगवापांगव केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तर परिसरातील तणाव नियंत्रणात आल्याचे वृत्त आहे.

Published on: May 20, 2023 10:36 AM
RBI 2000 Rupee Note | दोन हाजाराच्या नोटबंदीवर गुलाबराव पाटील यांचं मिश्कील भाष्य, म्हणाले…
गाजावाजा करत 2 हजारांची नोट दाखवत होते अन् आता…, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल