Aurangzeb Tomb : पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे
Chhatrapati Sambhajinagar Khultabad News : औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला असतानाच आता पुरातत्व विभागाने देखील या कबरीजवळ कोणाला जाता येऊ नये आणि कबरीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी याठिकाणी पत्रे ठोके आहेत.
औरंगजेबाच्या कबरीचा वाद चिघळला असल्याने ठिकठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणाला पोहोचता येऊ नये यासाठी पुरातत्व विभागाने खबरदारीचे उपाय केले आहेत. या कबरी जवळ पुरातत्व विभागाने आता पत्रे ठोकले आहेत. तसंच पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. जैनूद्दीन शिराजी बाबांच्या दर्ग्याच्या बाजूने हे पत्रे लावण्यात आले आहेत. याठिकाणी संगमरवरी जाळीदार भिंत होती. त्यातून देखील औरंगजेबाची कबर बघता येत होती. मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे आता पत्रे लावले गेले आहेत. कबरीला कुठलाही धोका होऊनये यासाठी साधारण 12 फुट उंचीचे हे पत्रे लावण्यात आलेले आहेत.
Published on: Mar 20, 2025 01:07 PM