“शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे लोकोस्तव”, संभाजीराजे छत्रपती यांचे शिवरायांना अभिवादन
किल्ले रायगडावर आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. या साठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गडावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल झाले आहेत.रायगड किल्यावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रायगड : किल्ले रायगडावर आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. या साठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गडावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल झाले आहेत.रायगड किल्यावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून निघाला आहे. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषांनी शिवभक्तांमध्ये उत्साह दिसत आहे. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित शिवभक्तांना रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी मार्गदर्शन केले. आजचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ सोहळा नसून तो लोकोत्सव आहे, असे ते म्हणाले.
Published on: Jun 06, 2023 12:25 PM