Samna Interview: सामानाची मुलाखत म्हणजे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न- योगेश खैरे
सोशल मीडियावर विडिओ पोस्ट करून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ही कौटुंबिक चर्चा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची दोन दिवसांआधी सामनामध्ये घेतलेली मुलाखत (Samna Interview) सध्या चर्चेचा विषय आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सामानाची मुलाखत म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या योगेश खैरे यांनी दिली. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ही कौटुंबिक चर्चा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. निम्या प्रश्नांची उत्तरं मुलाखत घेणारेच देत होते असेही ते म्हणाले. शिवसेनेला आत्मपरीक्षणाची गरज असताना सगळेच कसे दोषी आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून झाल्याचे मतंही खैरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या जनतेवर मुदतपूर्व निवडणूक लादण्याचा उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न या मुलाखतीतून दिसत असल्याचे योगेश खैरे म्हणाले.