समृद्धी महामार्गावरून टीव्ही 9 मराठीची टेस्ट ड्राईव्ह; पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच
2 मे रोजी समृद्धी महामार्गाचं (Samrudhi Highway) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागपूर- मुंबई 710 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. नागपूर-वाशिम (Nagpur-Washim) 210 किलोमीटरचा पहिला टप्पा दोन तारखेला सुरु होतोय.
2 मे रोजी समृद्धी महामार्गाचं (Samrudhi Highway) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागपूर- मुंबई 710 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. नागपूर-वाशिम (Nagpur-Washim) 210 किलोमीटरचा पहिला टप्पा दोन तारखेला सुरु होतोय. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, अमरावती (Amravati), अकोला, वाशिम जिल्ह्यातील महामार्गाची होणार सुरुवात आहे. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृद्धी देणारा हा महामार्ग आहे. देशातील सर्वात मोठा समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे? याची टेस्ट ड्राईव्ह केली आहे. गजानन उमाटे यांनी. या विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाचे नियोजन केले आहे. रस्त्याच्या आजूबाजूनं इंडस्ट्रीयल कॉरिडोर (Industrial Corridor) उघडला जाणार आहे. अनेक गाव या महामार्गाशी जुळलेली आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. रोजगार मिळेल, या उद्देशानं हा महामार्ग बनविला गेला आहे. हे सर्व विकासचं प्रतीक असल्यानं या महामार्गाचं नाव समृद्धी महामार्ग असं ठेवण्यात आलंय.