जनसामान्यांना दिलासा! आता आधारवर मिळणार ही गोष्ट, आधारनंबर टाका आणि मिळवा फक्त 600 रूपयात…
राज्य सरकारने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्या वाळू धोरणाची घोषित केली होती, त्याप्रमाणे ते आता लागू होणार आहे. या धोरणानुसार एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर नागरिकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेती मिळेल.
मुंबई : राज्यातील रेती माफिया (Sand Mafia), बेकायदा उत्खननाला आता चाप लागणार आहे. त्याचबरोबर रेतीचे दर देखील जनसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. यामुळे खिशाला बसणारी झळ कमी होऊन अनेकांच्या घराचे स्वप्न पुर्ण होण्यास मदत होणार आहे. येत्या महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) सुधारित रेती/वाळू धोरण राज्य शासनामार्फत लागू केलं जाणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून आणि आधार कार्डच्या (Aadhaar Card) माध्यमातून वाळू मिळणार आहे. राज्य सरकारने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्या वाळू धोरणाची घोषित केली होती, त्याप्रमाणे ते आता लागू होणार आहे. या धोरणानुसार एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर नागरिकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेती मिळेल. तर विशेष बाब म्हणजे रेती/वाळू 600 रुपये प्रति ब्रास या दराने मिळणार आहे. याबाबतची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली होती.