“अनिल परब सरकारचे जावई आहेत का?”, पालिका अधिकाऱ्यावर मारहाण प्रकरणी संदीप देशपांडे यांची टीका

| Updated on: Jun 27, 2023 | 12:40 PM

वांद्रे पूर्वच्या शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करताना बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. शिवसेना नेते अनिल परब यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: वांद्रे पूर्वच्या शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करताना बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. शिवसेना नेते अनिल परब यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. “नारायण राणे, मलिश्का, कंगना यांच्यावर कारवाई यांनी केली होती. तुम्ही जेव्हा अनधिकृत बांधकामावर कारवाई केली तेव्हा चालतं? तुम्ही जे पेरलं तेच उगवत आहे. अनिल परब हे आंदोलनाचे नेतृत्व करत होते. अनिल परबावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांना का सोडण्यात आलं आहे? ते काय सरकारचे जावई आहेत का? ते पाण्याच्या प्रश्नासाठी गेले नव्हते, मारहाण करायलाच गेले होते,” असं देशपांडे म्हणाले.

Published on: Jun 27, 2023 12:40 PM
उद्धव ठाकरे यांच्या मोर्चामागचं नेमकं कारण काय? संजय शिरसाट स्पष्टच म्हणाले…
भगीरथ भालके राष्ट्रवादीत कोणावर नाराज? शरद पवार, अजित पवार की सुप्रिया सुळे? पाहा व्हिडीओ…