संदीप देशपांडे यांच्यावरचा ‘तो’ हल्ला उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी?
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला प्रकरणी आरोप पत्र दाखल झालेला आहे. त्यामधील आरोपी अशोक खरात यांनी हे सगळे उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी केला आहे असा खुलासा केला आहे.
नागपूर : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला प्रकरणी आरोप पत्र दाखल झालेला आहे. त्यामधील आरोपी अशोक खरात यांनी हे सगळे उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी केला आहे असा खुलासा केला आहे. त्यावरती संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ते म्हणाले की, मोग्याम्बो खुश झाला असेल.उद्धव ठाकरे यांची मानसिकता काय आहे, शिवसैनिकांची मानसिकता कशी आहे हे यावरून सिद्ध होतं.चार्शिटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, या हल्ल्याचा कट चेंबूरला निलेश पराडकर यांच्या ऑफिसला रचला गेला. निलेश पराडकर शिवसेना उबाठाचा माथाडी कामगार पदाधिकारी आहे, तो सुनील राऊत आणि संजय राऊत यांच्या जवळचा माणूस आहे.दिवसभर राऊत बंधूकडे असणारा तो माणूस आहे निलेश पराडकर आता फरार आहे. त्याला जेव्हा अटक होईल त्यावेळी कोणाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला हे स्पष्ट होईल,” असं संदीप देशपांडे म्हणाले.