ज्यांनी देशात आणीबाणी लावली त्यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा; मनसेचं टीकास्त्र

| Updated on: Mar 28, 2023 | 10:55 AM

Uddhav Thackeray : मनसेने राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'त्या' घटनेचाही उल्लेखही करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : राहुल गांधी यांना झालेली शिक्षा. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी गेली. या सगळ्यावर प्रतिक्रिया येत आहेत. मनसेने राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “ज्या काँग्रेसने देशामध्ये आणीबाणी लावली. त्याला शिवसेनेच्या ठाकरेगटाने पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. आताची राष्ट्रवादी त्याच काँग्रेसचा भाग आहे. तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे काँग्रेस राष्ट्र्वादी मान्य करेल का?”, असा सवाल मनसेचे नेते, संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

Published on: Mar 28, 2023 10:25 AM
एकनाथ शिंदे यांना सावरकरांचं कार्य माहिती नाही, ते कागद केवळ वाचतात; संजय राऊत यांचा घणाघात
कोश्यारींनी शिवरायांचा अवमान केला तेव्हा भाजपला गौरव यात्रा का काढावी वाटली नाही; संजय राऊतांचा सवाल