“कर्नाटकात काँग्रेसला म्हैसूर मिळाला, पण महाराष्ट्रात श्रीखंड मिळणार नाही”, मनसेचा टोला

| Updated on: Aug 02, 2023 | 2:56 PM

मनसे नेते संदीप देशपाडे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, "तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशी महाविकास आघाडीची स्थिती झाली आहे", असे संदीप देशपांडे म्हणाले.

मुंबई : मनसे नेते संदीप देशपाडे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, “तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशी महाविकास आघाडीची स्थिती झाली आहे”, असे संदीप देशपांडे म्हणाले. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावरून संदीप देशपांडे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. कर्नाटकात काँग्रेसला म्हैसूर मिळाला तसं महाराष्ट्रात श्रीखंड मिळेल अशी आशा काँग्रेसने बाळगू नये.कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्व आणि महाराष्ट्रतील काँग्रेस नेतृत्व यामध्ये फरक आहे, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये एकता नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

Published on: May 23, 2023 03:20 PM
Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तारात ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ, या नेत्याने तारिख सांगितली
अडीच वर्ष पर्यटनमंत्री पण कोकणात एकही प्रकल्प नाही, आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल