Silver Oak Attack | शरद पवारांच्या घरावरच्या हल्ल्याचा कट सदावर्तेंच्या टेरेसवर

| Updated on: Apr 14, 2022 | 10:55 PM

आंदोलनाचे सगळे नियोजन संदीप गोडबोलेने केले होते. न्यायालयात त्याला वकील पाहिजे का असा सवाल केल्यानंतर त्याने माझे वकील करायची ऐपत नसल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर हल्ला झाल्याप्रकरणी संदीप गोडबोलेला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 7 एप्रिल रोजी सदावर्तेंच्या घराच्या टेरेसवर यासंदर्भात बैठक झाली असल्याचेही संदीप गोडबोलेने सांगितले. या बैठकीत संदीप गोडबोले प्रत्यक्ष हजर नसला तरी अभिषेक पाटील बरोबर झालेल्या संभाषणात मोर्चातील काही गोष्टी ठरवण्यात आल्या. माणसं कुठे तयार ठेवायची, कुठून कुठे जायचं, सगळे जण सिल्व्हर ओकवर किती वाजता यायचं हे ठरले होते. त्यानंतर मी फक्त आंदोलन ठिकाणी हजर असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनाचे सगळे नियोजन संदीप गोडबोलेने केले होते. न्यायालयात त्याला वकील पाहिजे का असा सवाल केल्यानंतर त्याने माझे वकील करायची ऐपत नसल्याचे सांगितले. न्यायालयाने तुला काही सांगायचे आहे का असा सवाल केल्यानंतर त्याने आंदोलनात केलेल्या नेतृत्वाची कबूली दिली.

7 April ला बैठक झाल्याप्रमाणे आम्हाला निरोप मिळाल्याची कबूली Sanjay Godbole नं दिली – Pradeep Gharat
Special Report | आधी राज ठाकरे आता देवेंद्र फडणवीस… टार्गेट शरद पवार