लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरे विसरलेत का असे म्हणणाऱ्यांना आज उत्तर मिळेल – संदीप देशपांडे
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेले भाषण भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. पण मनसे स्थापनेपासून केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी याआधीही ते सर्व मुद्दे घेतले होते. हे सर्वांना पुराव्यासह पटवून देणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंची ‘लाव रे तो व्हिडीओ’ संकल्पना लक्षवेधी ठरली होती.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेले भाषण भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. पण मनसे स्थापनेपासून केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी याआधीही ते सर्व मुद्दे घेतले होते. हे सर्वांना पुराव्यासह पटवून देणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंची ‘लाव रे तो व्हिडीओ’ संकल्पना लक्षवेधी ठरली होती. ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून त्यावेळी राज ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला होता निशाणा. राज ठाकरे यांची आजची ठाण्यातली सभा विरोधकांसाठी ही उत्तर सभा आहे. लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरे विसरलेत का असे म्हणणाऱ्यांना आजच्या सभेत नक्की उतर मिळेल. वसंत मोरे यांनी आपली नाराजी दूर झाल्याचं म्हटलं आहे. मराठी आमची श्वास आहे दुसऱ्या भाषेत ट्विट करत नाही, संजय राऊत मराठीचा गजर करतात आणि शेर मात्र हिंदीत लिहितात अशी टिका संदीप देशपांडेंनी राऊतांवरती केली.