जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील राड्यानंतर संदीपान भुमरे- अंबादास दानवे यांचं स्पष्टीकरण!

| Updated on: Aug 07, 2023 | 3:00 PM

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला.

औरंगाबाद, 7 ऑगस्ट 2023 | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला.दोन नेत्यांच्या वादावादीचा व्हिडीओ समोर आला आहे. या वादावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “प्रत्येकाला वाटतं आम्ही सत्तेमध्ये नसलो तरी आम्हाला निधी जास्त मिळाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो त्याला निश्चितच निधी जास्त मिळतो हा अलिखित नियम आहे. पुर्वी तुम्हाला जो निधी मिळत होता त्यामध्ये कमतरता झाली नाही मग आता तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला. यानंतर संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे यांनी माध्यामांसमोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

 

Published on: Aug 07, 2023 03:00 PM
‘मोदी आणि ठाकरे यांची विचारधारा एकच, आम्ही फक्त ओबीसीसाठी’; ओवैसी यांची टीका
BEST च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सलग ६ व्या दिवशी संप सुरू, बेस्टच्या PRO चं म्हणणं नेमकं काय?