“संजय राऊत यांनी निवडणूक लढवून दाखवावी, दूध का दूध पाणी का पाणी होईल”, शिवसेनेच्या नेत्याचं चॅलेंज
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुका लावा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं वक्तव्य केलं आहे. यावर शिंदे यांच्या शिवसेनेतले आमदार संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुका लावा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं वक्तव्य केलं आहे. यावर शिंदे यांच्या शिवसेनेतले आमदार संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवावी.म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. ते आयत्या मतांवर निवडून आले आहेत. सकाळी ते टिव्हीवर बोलायला आले की, लोकं चॅनल बदलतात. आता संजय राऊत यांचा लोकं तिरस्कार करत आहेत. 2024 मध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ, तेव्हा युतीच सरकार येणार आणि एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असं संदीपान भुमरे म्हणाले.