इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती जयंत पाटलांच्या गटाकडे; 18 पैकी 17 जागा राष्ट्रवादीकडे

| Updated on: Apr 29, 2023 | 12:30 PM

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची पुन्हा एका हाती सत्ता आलीये. 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे उमेदवार विजयी झालेत. पाहा व्हीडिओ...

इस्लामपूर, सांगली : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची पुन्हा एका हाती सत्ता आली आहे. 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी सर्वपक्षीय आघाडीला हमाल तोलाईदार गटातून केवळ 1 जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा बाजार समितीवर आपलं वर्चस्व राखलं आहे. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करत राष्ट्रवादीने आपली सत्ता राखली आहे. 18 पैकी 17 जागा राष्ट्रवादीकडे हमाल गटात भाजप-शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी आज झाली. सांगली बाजार समितीसाठी 93. 45 टक्के तर इस्लामपूर बाजार समितीसाठी 86. 57 टक्के आणि विटा बाजार समितीसाठी 91. 30 टक्के इतके मतदान झालं आहे.

Published on: Apr 29, 2023 12:25 PM
रिफायनरीसाठी ‘हे’ यांचं हिंदुत्व; मराठी माणसावर हल्ले… राऊत यांची सरकारवर काय टीका
वादळं, गारा अन् अवकाळीचा हाहाकार, शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान; दोघांचा मृत्यू