महापालिका आयुक्तांच्या घरावर मासे फेकत आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

| Updated on: Mar 11, 2023 | 8:12 AM

Sangali : महापालिका आयुक्तांच्या विरोधात सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या वतीने आयुक्तांच्या घरावर मासे फेकत आंदोलन करण्यात आलं. पाहा व्हीडिओ...

सांगली : गेल्या दोन दिवसापासून सांगली महापालिकेच्या शेरीनाल्यातून आणि वसंतदादा साखर कारखान्यामधून मळीमिश्रीत आणि प्रदुषित पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्यात माशाचा खच पडला आहे. यामुळे हरिपूर संगमापासून ते नृसिंहवाडीपर्यंत मासे कृष्णा नदीत तरंगू लागले आहेत. संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी रात्री मृत मासे फेकले. यावेळी त्यांनी सोडल्या जाणारं पाणी त्वरित रोखण्याची मागणी केली.

Published on: Mar 11, 2023 08:12 AM
बाहेरचे लोक आणून सभा घ्यावी लागते यातच ‘त्यांचे’ अपयश; योगेश कदम यांचा पलटवार
आमचे 40 चुकार भाऊ भाजपापासून बाजूला जाणार का? सुषमा अंधारे यांचा प्रश्न