जुनी पेन्शन योजना लागू करा; सांगलीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा
Sangali teachers Andolan : सांगलीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...
सांगली : सांगलीत आज शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सांगलीत आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात सहभागी होणार आहेत. सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून थोड्याच वेळात मोर्चा निघणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते स्टेशन चौकापर्यंत मोर्चा निघणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील चौकात कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदमही या मोर्चात सहभागी झाले आहेत.
Published on: Mar 12, 2023 11:24 AM