VIDEO : पुराच्या पाण्यात पुलावरुन उडी, सांगलीत तरुणाची थरारक स्टंटबाजी

| Updated on: Jun 19, 2021 | 1:21 PM

तुफान पावसाने सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली आहे. मात्र पुराच्या पाण्यात काही उत्साही तरुण स्टंटबाजी करत आहेत.

सांगली : तुफान पावसाने सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली आहे. मात्र पुराच्या पाण्यात काही उत्साही तरुण स्टंटबाजी करत आहेत. आयर्विन पुलावरुन नदीत उंचावरून उड्या मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सांगलीमधील एक तरुण पुलावरुन उडी मारतानाचा व्हिडीओ सांगली परिसरात व्हायरल झाला आहे. मागील काही वर्षापासून कृष्णेची पाणीपातळी वाढली, की अशा उड्या मारण्याचा प्रकार होत असतो. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांपर्यंत आली आहे. सांगली कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मात्र पुराच्या पाण्यात अशी स्टंटबाजी करणाऱ्यांना आवरणं आवश्यक आहे. (Sangli Krishna river flood Youth dive stunt in river from top of the irwin bridge Maharashtra rains update)

VIDEO : Kolhapur मधील कुरुंदवाड शिरढोण दरम्यानच्या पुलावर पाणी येण्याची शक्यता
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 19 June 2021