सांगलीतील मासे मृत्यू प्रकरणी सांगली प्रदूषण महामंडळाने उगारला कारवाईचा बडगा, पाहा…

| Updated on: Mar 11, 2023 | 11:15 AM

संतप्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगली महापालिका आयुक्तांच्या घरासमोर मृत मासे फेकले आहेत.आयुक्त सुनील पवार यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर हे मृत मासे टाकण्यात आले आहेत. आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी...

सांगली :  सांगलीमधील मासे मृत्यू प्रकरणी प्रदूषण महामंडळाने उगारला कारवाईचा बडगा उगारला आहे. अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यू प्रकरणी सांगलीच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याला प्रदूषण मंडळाने नोटीस बजावलीये. दत्त इंडिया संचलित साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीत मिसळल्याने माशांच्या मृत्यू झाला. साखर कारखाना बंद का करू नये, याबाबत बजावण्यात नोटीस आली आहे. सांगली महापालिकेलाही फौजदारी कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. प्रदूषण महामंडळ अधिकारी नवनाथ औताडे यांनी ही माहिती दिली आहे. तसंच सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यूनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

दौरा देवेंद्र फडणवीस यांचा अन् चर्चा रोहित पवार यांच्या फ्लेक्सची!
अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना आज कोर्टात हजर केलं जाणार