अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे एकनाथ शिंदे अडचणीत? संजय राऊत म्हणतात, “आता राजीनामा देणार का?”
अजित पवार यांच्या बंडामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत छगन भुजबळाच्या त्या किस्सांची आठवम करून दिली होती. तसेच शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्व सोडल्याचा आरडाओरडा करत बंड केला होता. मात्र आता अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे एकनाथ शिंदे राष्ट्रवादीसोबत मांडिला मांडी लावून बसले आहेत. यावरून संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणारे छगन भुजबळ यांच्या मांडिला मांडी लावून आम्ही कसं बसू असं एकनाथ शिंदे बोलत होते, मग आता ते राजीनाम्याची भूमिका घेणार का? ज्या अजित पवारांमुळे आम्ही शिवसेना सोडली त्यांना आम्ही मंत्रिमंडळात घेणार नाही, अशी भूमिका हे आमदार घेणार का? हा सगळा राजकीय स्वार्थ आहे.”