भाजपनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही; शिंदेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

| Updated on: Feb 04, 2023 | 8:01 AM

शिंदेगट आणि भाजपमध्ये सारं काही अलबेल नाही का? असा सवाल सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण ठरलंय शिंदेगटाच्या आमदाराने भाजपवर केलेले आरोप. पाहा...

बुलढाणा : शिंदेगट आणि भाजपमध्ये सारं काही अलबेल नाही का? असा सवाल सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण ठरलंय शिंदेगटाच्या आमदाराने भाजपवर केलेले आरोप. शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर टीका केलीय. भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयाचा अभाव त्यामुळेच रणजीत पाटलाचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलंय. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार रणजीत पाटील आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळेच रणजीत पाटील यांचा पराभव झाला. आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर रणजीत पाटील यांचा विजय झाला असता, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.

Published on: Feb 04, 2023 08:01 AM
“आम्ही एक दावा ठोकला तर संजय राऊतांना रोज कोर्टात जावं लागेल, पण आम्ही नादी लागत नाही”
मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प, यासह जाणून घ्या इतर घडामोडी