ठाकरे गटातील सगळ्या नेत्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकायला पाहिजे, कारण…; शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल
शिवसेना पक्ष, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वॉशिंग मशीन यावरून सध्या टीका टिपण्णी सुरू आहे. शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे गटावर जोरदार टीकाही केली आहे. पाहा...
मुंबई : शिवसेना आणि भाजपकडे वॉशिंग मशीन आहे. आधी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले नेते शिवसेनेत गेल्यावर स्वच्छ होतात, असा आरोप विरोधक वारंवार करतात. आज सकाळीही ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वॉशिंग मशीनचा उल्लेख केला. त्याला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे. “ठाकरे गटातील सगळ्या नेत्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकायला पाहिजे, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार घेतले. त्यामुळे त्यांना डोकं धुवायचं असेल. त्यांना जर पुन्हा बाळासाहेबांचे विचार घ्यायचे असतील तर त्यांनी आमच्या वॉशिंग मशीनमध्ये आलं पाहिजे”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
Published on: Mar 14, 2023 12:49 PM