7 April ला बैठक झाल्याप्रमाणे आम्हाला निरोप मिळाल्याची कबूली Sanjay Godbole नं दिली - Pradeep Gharat

7 April ला बैठक झाल्याप्रमाणे आम्हाला निरोप मिळाल्याची कबूली Sanjay Godbole नं दिली – Pradeep Gharat

| Updated on: Apr 14, 2022 | 7:28 PM

नागपुरातील एसटी कर्मचारी संदीप गोडबोलेला मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. गोडबोले महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात यांत्रिक पदावर कार्यरत असून पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी तो सदावर्तेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर एसटी आंदोलकांनी केलेल्या कथित हल्ला केल्या प्रकरणी नागपुरातून अटक करण्यात आलेल्या संदीप गोडबोलेला (Sandeep Godbole) मुंबईतील कोर्टाच्या दंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरूनच पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी धडकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली होती. तर पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शनही उघड झालं आहे. नागपुरातील एसटी कर्मचारी संदीप गोडबोलेला मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. गोडबोले महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात यांत्रिक पदावर कार्यरत असून पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी तो सदावर्तेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

14 टि्वटस मध्ये Fadnavis काय म्हणाले ?
Silver Oak Attack | शरद पवारांच्या घरावरच्या हल्ल्याचा कट सदावर्तेंच्या टेरेसवर