रविंद्र धंगेकरजी, विजयी झालात, खूप-खूप अभिनंदन!; भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

| Updated on: Mar 02, 2023 | 3:38 PM

रविंद्र धंगेकर यांना 73, 194 मतं मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना कसब्यातील जनतेनं 62, 244 मतं दिली आहेत. रविंद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य मिळवत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभूत केलंय. यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. या विजयानंतर भाजपचे नेते संजय काकडे यांनी धंगेकर यांचं अभिनंदन केलं आहे. संजय काकडे यांनी रविंद्र धंगेकर यांचं मेसेज करत अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्याआहेत. आम्ही पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. देवेंद्र फडणवीसांना मी मेसेज केलाय. आम्ही या पराभवाला जबाबदार आहोत. मी म्हटलं आहे. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. ही निवडणूक जनतेनं हातात घेतली होती. ही निवडणूक रविंद्र धंगेकर विरुद्ध रासने होती, असं टीव्ही 9 मराठीशी बोलताना संजय काकडे म्हणालेत.

Published on: Mar 02, 2023 03:38 PM
रविंद्र धंगेकर यांना मतं कशी आणि का मिळाली? दीपक केसरकर यांनी ‘लॉजिक’ सांगितलं…
एका मतासाठी ५ हजार रूपये दिले गेले अन्… , राष्ट्रवादीच्या आमदारानं काय केला मोठा गौप्यस्फोट