“तानाजी सावंत नेहमी अनाजीच्या भूमिकेत, लवकरच मंत्रीपद जाणार अन् आरोग्यही बिघडणार”, ठाकरे गटाचा घणाघात
तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
कोल्हापूर : तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. “सुशिक्षित लोकांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा केली जाते.राजकारणात ॲक्शनला रिएक्शन येऊ दे, पण तुम्ही कोणती भाषा वापरत आहेत. भाजप म्हणतो, आम्ही सुसंस्कृत आहोत, मग असे मंत्री तुम्हाला चालतात का? ज्यांनी गद्दारी केली, विश्वासघात केला, त्यांच्या मतदारसंघात जाऊन सुषमा अंधारे पोलखोल करतायेत.त्यांचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही भाषा जपून वापरा. यांचं नाव तानाजी असलं तरी कायम हे अनाजीच्या भूमिकेत राहिले आहेत. त्यामुळे यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा नाही. लवकरच आपलं मंत्रीपद आणि आमदारकी जाणार आहे, त्यामुळे तानाजी सावंत यांचा आरोग्य बिघडणार आहे, असं संजय पवार म्हणाले.
Published on: May 28, 2023 12:24 PM