‘ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांनाच आमचा कालचा मेळावा नाच गाणं वाटत असावा”
ठाकरेंचा मेळावा म्हणजे नाचगाणं, अशी टीका केली आहे. ठाकरेगटाचे नेते संजय पवार यांनी आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
कोल्हापूर : ठाकरेंचा मेळावा म्हणजे नाचगाणं, अशी टीका केली आहे. ठाकरेगटाचे नेते संजय पवार यांनी आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांनाच आमचा कालचा मेळावा नाच गाणं वाटत असावा, असं संजय पवार म्हणालेत. निवडणुका लावा कोणाचा नाच होतो कळेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. बाळासाहेब ठाकरे हा आमच्यासाठी भावनिक विषय आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना स्वतःचा बाप लक्षात ठेवायला सांगितलं आहे, असं संजय पवार म्हणालेत.
Published on: Jan 24, 2023 01:44 PM