“सभा यशस्वी करण्याचा हा केविलवाना प्रयत्न”,’शासन आपल्या दारी’योजनेवरुन ठाकरे गटाचा सरकारवर निशाणा

| Updated on: Jun 06, 2023 | 1:28 PM

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात 'शासन आपल्या दारी' हे अभियान राबविण्यात येत आहे. या शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे संजय पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे संजय पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सरकारी यंत्रणा वापरून सभा यशस्वी करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही म्हणून हे कार्यक्रम करावे लागत आहेत, असं संजय पवार म्हणाले. तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून पैसे वापरले जात आहेत.अशा राजकीय कार्यक्रमासाठी नियोजन समितीचे पैसे वापरता येणार नाहीत. या विरोधात आवाज उठवणार असल्याचा इशारा”, संजय पवार यांनी दिला आहे.

Published on: Jun 06, 2023 01:28 PM
“शिवरायांनी रयतेचं राज्य चालवलं, भोसले यांचं नाही” – शरद पवार
Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारात फक्त १४ जणांना संधी, तर उर्वरित लोकांची नाराजी शिंदे-फडणवीस कशी करणार दूर?