Special Report | “ठाकरेंची साथ सोडायची नव्हती, पण…”, संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय चाललंय?

| Updated on: Jun 05, 2023 | 7:47 AM

गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार गेले, तर अनेक खासदारही शिवसेनेत सामिल झाले आहेत. त्यात संजय राठोड सुरुवातीपासूनच शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पाहायला मिळाले. त्यांना कॅबिनेट मंत्री पदही देण्यात आलं आहे. मात्र रविवारी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आयोजित बंजारा समाजाच्या मेळाव्यात त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई : गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार गेले, तर अनेक खासदारही शिवसेनेत सामिल झाले आहेत. त्यात संजय राठोड सुरुवातीपासूनच शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पाहायला मिळाले. त्यांना कॅबिनेट मंत्री पदही देण्यात आलं आहे. मात्र रविवारी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आयोजित बंजारा समाजाच्या मेळाव्यात त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेनेत बंड झाले, तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार होतो. परंतु उद्धव ठाकरे यांचे सरकार पु्न्हा येणार नाही, समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल तर सत्ते राहिलं पाहिजे, असा सल्ला समाजाच्या संत महंतांनी मला दिला होता. त्यानंतरच आपण गुवाहाटीला जावून शिंदे गटात सामील झालो, अशी स्पष्ट कबुली संजय राठोड यांनी दिली आहे. संजय राठोड यांच्या या वक्तव्याने त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे? यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 05, 2023 07:47 AM
रेल्वे अपघातापाठोपाठ बिहारमध्ये मोठी दुर्घटना! अवघ्या 10 सेकंदात पुल नदीतच कोसळला, कुठं घडली ही घटना?
‘… हा पत्रकारांचा अपमान’, संजय राऊत यांच्या ‘त्या’ कृत्यावर बोलताना शिवसेना नेता आक्रमक