दोन वर्षाआधी मला राजीनामा द्यावा लागला, पण समाजाच्या पाठिंब्यामुळे मला पुन्हा संधी मिळाली- संजय राठोड
भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मंत्रिपदावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
वाशिम : भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आज पोहरादेवीतील कार्यक्रमात व्यस्त आहे. त्यामुळे मला याबाबत काही माहिती नाही. त्यामुळे मी यावर बोलू इच्छित नाही, असं संजय राठोड म्हणालेत. मला दोन वर्षापूर्वी वाईट घटनेला सामोरे जावे लागले. त्यानंतर मला राजीनामा द्यावा लागला. परंतु पुन्हा काही दिवसांनी मला मंत्रिपदाची नव्या सरकारमध्ये संधी मिळाली. संपुर्ण समाज माझ्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे हे सगळं शक्य झालं. बंजारा समाजाची संस्कृती समृध्द आहे. या स्थळाचा कायापालट करण्याचा ध्यास आम्हीं घेतला आहे, असंही संजय राठोड म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 02:48 PM