“दसरा मेळावा म्हणजे विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस! पण…”, संजय राठोड काय म्हणाले? पाहा…
Sanjay Rathod : संजय राठोड यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय.
यवतमाळ : संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. दसरा मेळावा (Dasara Melava) म्हणजे विचारांचं सोन लुटण्याचा दिवस…शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मार्गदर्शन करायचे तेव्हा त्यांचे विचार वर्षभर आम्हाला प्रेरणा द्यायचे. त्या जोरावर आम्ही शिवसैनिक वर्षभर काम करायचो. पण आता तसं राहिलेलं नाही. मधल्या काही दिवसांत आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही शिवसेनेमधून 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेलो. बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षा असलेल्या हिंदुत्व विचाराची युती आम्ही केली. या वर्षीच्या एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहतील. एकनाथ शिंदेंचे विचार ऐकायला येतील, असं संजय राठोड म्हणाले आहेत.
Published on: Sep 25, 2022 02:42 PM