“पोहरादेवीच्या महंतांनी सांगितल्यामुळे मी शिंदेंसोबत गेलो”, संजय राठोड यांचं मोठं विधान

| Updated on: Jun 05, 2023 | 8:02 AM

मी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र बंजारा समाजातील महंतांच्या सांगण्यावरून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आपण सरकारमध्ये असलो तर आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवता येतील, यासाठी महंतांनी मला हा सल्ला दिला होता, असा दावा कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी केला आहे.

बीड : मी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र बंजारा समाजातील महंतांच्या सांगण्यावरून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे यांचे सरकार पु्न्हा येणार नाही, समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल तर सत्तेत राहिलं पाहिजे, यासाठी महंतांनी मला हा सल्ला दिला होता, असा दावा कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आयोजित बंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.संजय राठोड यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार गेले, तर अनेक खासदारही शिवसेनेत सामिल झाले आहेत. त्यात संजय राठोड सुरुवातीपासूनच शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पाहायला मिळाले.

Published on: Jun 05, 2023 08:02 AM
‘… हा पत्रकारांचा अपमान’, संजय राऊत यांच्या ‘त्या’ कृत्यावर बोलताना शिवसेना नेता आक्रमक
अरोग्य विभागाला ‘डाग’ लावणारा प्रकार! बत्तीगुलचा फटका? प्रसुती झालेल्या माताही लाईटच्या प्रतिक्षेत