“बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश वर्षावरून” संजय राऊत यांचा गंभीर आरोप
वांद्रे पूर्वेकडील शिवसेनेची शाखा पाडताना बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गट आणि शिवसेनेत चांगली झुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील शिवसेनेची शाखा पाडताना बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गट आणि शिवसेनेत चांगली झुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक चाळीस-पन्नास वर्षाची जुनी शाखा हातोडे मारून तोडण्यात आली, बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडे मारले जात होते. लाज नाही वाटली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, सरकारला? हे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे म्हणता. हे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे म्हणता. माझी पक्की माहिती आहे, हे हातोडे मारण्याचे आदेश वर्षा बंगल्यावरून आले. मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव त्यांच्याकडे कोणीतरी गेलं, त्यांनी हे आदेश दिलेले आहेत. यांनी शिवसेनेचे नाव घेऊ नये, ते नकली आणि डुबलीकेटच राहणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.