महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर राऊत यांचा खळबळजनक आरोप; झाकीर नाईकचा विषय काय?
त्यांनी भुसे आणि कुल यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्यमंत्री, सीबीआय यांना दिलीत मात्र आजपर्यंत धाडी पडल्या नाहीत. या दोघांवर धाडी का पडत नाही असा सवाल करत भुसे यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तर याचदरम्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मोठा अरोप देखील त्यांनी यावेळी केला.
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कुल यांच्यावरून पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. त्यांनी भुसे आणि कुल यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्यमंत्री, सीबीआय यांना दिलीत मात्र आजपर्यंत धाडी पडल्या नाहीत. या दोघांवर धाडी का पडत नाही असा सवाल करत भुसे यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तर याचदरम्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मोठा अरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्यांनी विखे-पाटील यांच्याशी निगडीत संस्थेला झाकीर नाईक याच्या संस्थेकडून पैसा गेल्याचे म्हटलं आहे. इतकच नाही तर याबाबत आपल्याकडे पुरावे असून तेही लवकरच बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला आहे. झाकीर नाईककडून विखे-पाटील यांच्या संस्थेला 4 ते पाच कोटी रुपये देण्यात आल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.