संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट करण्याचा इशारा, तर संजय राऊत म्हणतात…
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत आपण मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला आहे. माझ्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांचा भोंगा कायमचा बंद होईल, असं संजय शिरसाट म्हणाले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला. शिवराळा भाषा वापरत संजय राऊत शिवसेनेच्या आमदारांवर नेहमी टीका करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. “पत्रकार परिषद घेऊन आपण संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणाक आहोत, माझ्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांचा भोंगा कायमचा बंद होईल”, असं संजय शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या दाव्यावर संजय राऊत यांना विचारलं असता, कोण शिरसाट? माहित नाही, असं राऊत म्हणाले. यामुळे संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे.
Published on: Jun 01, 2023 11:28 AM