सत्तासंघर्षावर आज सुनावणी; संजय राऊत, अनिल देसाई-अनिल परब न्यायालयात दाखल
मागच्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च सुनावणी होणार आहे. यासाठी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब न्यायालयात दाखल झाले आहेत.
मागच्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च सुनावणी होणार आहे. यात 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होते का? अध्यक्षांवरील अविश्वासाचा प्रस्ताव दाखल होता तेव्हा त्यांना हा अधिकार असतो का? अशा आठ पैकी एका मुद्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश वाय.एस.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठ यासंदर्भात निर्णय देणार आहे. ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर हा निर्णय होणार आहे. या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत (Sanjay Raut), अनिल देसाई, अनिल परब न्यायालयात दाखल झाले आहेत.
Published on: Jan 10, 2023 11:04 AM